महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पर्यटन लोकप्रिय बातम्या

पंढरपूर चंद्रभागा नदीचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक,भूजल विभागाचा अहवाल

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/xjvZcgcQ6GY

सोलापूर– वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला महत्त्वाचे स्थान आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र त्याचबरोबर चंद्रभागा तिरी स्नान करून तीर्थ म्हणून प्राशन करतात. चंद्रभागा नदीतील पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा अहवाल भूजल विभागाच्या वतीने देण्यात आला आहे याबाबतची माहिती वाल्मिकी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.

चंद्रभागा नदीचे संत साधुनी आपल्या अभंगांमधून पावित्र्य सांगितले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाची श्रद्धा स्थान असणारी चंद्रभागा गढूळ पाण्यामुळे खराब झाली आहे. चंद्रभागा नदी पात्रात येणारे पाणी हे मूत्र मिश्रित तसेच घाण, केरकचरा, शेवाळ अशा अनेक मिश्रीत होऊन नदीपात्रात सोडले जाते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारे भाविक हे चंद्रभागा नदीचे पावित्र्य समजून स्नान करतात व तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र भूजल विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे तरी भाविकांनी या नदीपात्रात आंघोळ करू नये असे आव्हान अंकुशराव यांच्याकडून करण्यात आले आहे

केंद्र सरकारकडून गंगा नदी स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षापूर्वी चंद्रभागा सफाई करण्यासाठी नमामी चंद्रभागा हा उपक्रम राबवण्यात आला होता मात्र हा उपक्रम कागदावरच असल्याचे दिसून येत आहे मात्र अशा पाण्यामुळे पांडुरंगाच्या नगरीत येणाऱ्या भाविकांसाठी हानीकारक असल्याचे चित्र दिसून येत आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »