नेशन न्युज मराठी टीम.
डोंबिवली – कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा हा गेल्या दशकभरापासून गाजतोय. या मुद्द्यावर उच्च न्यायालयानेही वारंवार केडीएमसीचे कान उपटले आहेत. मात्र त्यानंतरही कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांना रोखण्यात केडीएमसी प्रशासनाला अद्याप यश आलेले नाहीये. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत निर्णय घेत. कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानूसार या सर्व अनधिकृत बांधकामांवर पुढील 3 महिन्यात कारवाई केली जाईल. असा निर्णय घेतला आहे
केडीएमसी प्रशासनाने येणाऱ्या तीन महिन्यात 20 हजार अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणार असल्याचा निर्णय घेतला .या निर्णयानंतर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी या निर्णयावर टीका केली हा निर्णय लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचे त्यानी सांगितले.आता मनसे आमदार राजू पाटील यानी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यावर टीका केली.अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे मात्र गेल्या वर्षभर प्रशासकीय राजवट आहे या काळात किती अनधिकृत बांधकाम झाली याच ऑडिट झालं पाहिजे असा सवाल केडीएमसी प्रशासनाला केला आहे.
केडीएमसी मध्ये वर्षाभरापासून प्रशासकीय राजवट आहे. त्या काळात किती अनधिकृत बांधकामे झाली.कोणत्या अधिकारी बिल्डरवर कारवाई झाली. तीन महिन्यात 20 हजार बांधकाम पाडता येतील का ? फक्त निवडणुकीचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला ? अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी प्रशासनावर केली आहे . त्याच बरोबर आदी अनधिकृत बांधकाम प्रकरणी केडीएमसी अधिकारी आणि बिल्डरांवर कारवाही करा आशी मागणीहि त्यांनी केली.
जी बांधकामे झाली त्या संबंधित अधिकारी व बिल्डर वर कारवाई का केली नाही ,आता येत्या 3 महिन्यात 20 हजार बांधकाम तोडण्याची घोषणा केली हे शक्य आहे का ? निवडणूक जवळ आली आहे म्हणून काही टार्गेट देण्यात आले आहे. या टार्गेट साठी हे सर्व केलं जातंय का असा सवाल ही आमदार पाटील यांनी व्यक्त केला .



