महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

रायगड पोलीस दल राज्यातील “बेस्ट पोलीस युनिट अवार्ड” विजेता

अलिबाग/प्रतिनिधी – राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादे मध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या संबंधित पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहीत करणे इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी “सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार” प्रदान करण्याची बाब महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून रायगड जिल्हा पोलीस दलाची “बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड (Best Police Unit Award)” साठी निवड करण्यात आली आहे.

कामाच्या मूल्यांकनाचे निकष सकारात्मक, नकारात्मक मापदंड (Parameters) इत्यादीच्या अनुषंगाने घटकातील पूर्ण वर्षात (जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२०) दाखल गुन्ह्यांची माहिती विचारात घेऊन वार्षिक गुन्हेगारीच्या आधारावर तंतोतंत श्रेणी तयार न करता “कॅटेगरी A” – वार्षिक आयपीसी गुन्हे 6 हजार पेक्षा कमी असलेले जिल्हे/ आयुक्तालये, “कॅटेगरी B”- वार्षिक आयपीसी गुन्हे 6 हजार पेक्षा जास्त असलेले जिल्हे/ आयुक्तालये आणि “कॅटेगरी C”- पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखालील सर्व घटक अशा तीन श्रेणीमध्ये घटकांची विभागणी करण्यात आली होती. यापैकी “कॅटेगिरी A” मधून रायगड पोलीस दलाची “बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड” साठी निवड करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेन्‍द्र सिंह यांच्या स्वाक्षरीने आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. या निवडीबद्दल पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व संपूर्ण रायगड पोलीस दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »