DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याणमधील बारवे परिसरातील एका जमिनीच्या सातबारावर अवघ्या एका तासात दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदविल्याच्या प्रकरणात आता शेतकऱ्याचे नाव7/12 वर आले आहे. ते शेतकरी कुटुंब समोर आले आहे, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.
बारवे येथील शेतकरी कुटुंबातील बेबीबाई नामदेव मडवी या आजींनी या प्रकरणाबाबत आरोप केले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आले आहे, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांची आहे.
या प्रकरणात प्रेमनाथ म्हात्रेसह इतर विकासकांवर शेतकरी कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. शेतकरी कुटुंबाने मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बेबीबाई नामदेव मडवी यांनी केली आहे.या प्रकरणातील महसूल नोंदी, संबंधित कागदपत्रे आणि आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



