महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

तिरंगा रॅलीवरून भाजप-पोलिसांत वाद भाजपने घेतली हायकोर्टात धाव,न्यायालयाने दिली परवानगी

DESK MARATHI NEWS NETWORK

कल्याण/प्रतिनिधी –कल्याण पश्चिमेत भाजपच्या तिरंगा रॅलीवरून पोलीस आणि भाजप आमनेसामने आले . तिरंगा रॅलीच्या मार्गाला आक्षेप घेत बाजारपेठ पोलिसांनी भाजप नगरसेवकाला कलम १६८अंतर्गत नोटीस बजावली. या नोटीसच्या विरोधात भाजप नगरसेवक अमित धाक्रस यांनी थेटहायकोर्टात धाव घेतली. माझ्या देशात तिरंगा रॅली काढायची नाही का ? असा संतप्त सवालभाजपकडून उपस्थित करण्यात आला. हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी त्यांचे म्हणणेमांडले नाही. त्यामुळे हायकोर्टाने  तिरंगा रॅलीला परवानगी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचीनोटिस मागे घेतली आहे.

कल्याण पश्चिमेत स्वातंत्र्य दिना निमित्त भाजप जुने कल्याण शहर मंडळाच्या वतीने तिरंगा रॅलीचंआयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता अहिल्याबाईचौकातून रॅलीला सुरुवात होऊन टिळक चौक, पारनाका, दूधनाका, गांधी चौक, शंकरराव चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार होता.यासाठी भाजप सरचिटणीसअन्वेश जोशी यांनी १० ऑगस्ट रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र अवघ्या एका दिवसात पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अंतर्गतभाजपला नोटीस बजावली. रॅलीचा मार्ग पारंपरिक नसल्याचे सांगत पोलिसांनी १९९९ मध्येतत्कालीन ठाणे पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचा हवाला दिला. पारंपरिक मिरवणुकांव्यतिरिक्त इतर मिरवणुकांना परवानगी देऊ नये, असा आदेश असल्याचं पोलिसांनी नोटीसमध्येनमूद केले. त्यामुळे भाजपमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले. पोलिसांची नोटीसमिळाल्यानंतर भाजप नगरसेवक अमित धाक्रस यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली.  दरवर्षीआम्ही तिरंगा रॅली काढतो.काही अडचण असेल तर पोलिसांनी आम्हाला बोलावून मार्गकाढायला हवा होता. मात्र रॅलीच काढू नये, अशा पद्धतीची नोटीस देण्यात आली, असा आरोपत्यांनी केला तसेच, मी भारतीय नागरिक आहे की नाही? माझ्या तिरंग्याची रॅली मी काढायचीनाही ? असे पोलिस प्रशासन कसे सांगू शकते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणावर हायकोर्टात सुनावणी झालीय न्यायालयात पोलिसांकडून न्यायालायत काही म्हणणेमांडले गेले नाही.  त्यामुळे न्यायालयाने भाजपला न्यायालयाने परवानगी दिली आहे.  भाजपलादिलेली नोटीस पोलिसांनी मागे घेतली आहे. भाजपचा हा न्यायालयीन विजय असल्याो सांगत  धाक्रस यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्यायदे यांनी सांगितले की, पोलिसांनी तिरंगा रॅलीची परवानगी नाकारली नव्हती. दरवर्षी रॅली पारनाका मार्गावरून जाते. मात्रयावेळी दूध नाका मार्गाने रॅली काढण्याची परवानगी मागण्यात आली होती. हा परिसरसंवेदनशील असल्याने वरिष्ठांकडून परवानगी घेण्याबाबत भाजपला नोटीस देण्यात आली होती. पोलिसांची नोटीस देताना १९९९ च्या आदेशाचा हवाला दिला होता.

भाजपने हायकोर्टात धाव घेतल्यावर  पोलिसां माघार घ्यावी लागली.  या घडामोडीनंतर कल्याणपश्चिमेतील भाजपच्या तिरंगा रॅलीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता १५ ऑगस्टला तिरंगारॅली नियोजित मार्गावरून निघणार आहे. या रॅलीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »