महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम पोलिस टाइम्स

इराणी वस्तीत पोलिसांचे धडक कोंबिंग ऑपरेशन,तीन सराईत आरोपी ताब्यात, आठ लाखांचे एमडी जप्त

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – देशभरात चोरी, लूटमार आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी कुख्यात मानल्या जाणाऱ्या कल्याणमधील इराणी वस्तीत पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. डीसीपी अतुल झेंडे आणि एसीपी अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत शंभरहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन सराईत आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये दोन वॉण्टेड महिला आरोपींचा समावेश आहे. समा इराणी ही आंबिवली रेल्वे स्थानकात पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अनेक वर्षांपासून पोलिसांना हवी असलेली आरोपी होती. तर दुसरी महिला आरोपी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यात फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी आणखी दोन व्यक्तींनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांचा कोणत्याही गुन्ह्यात सहभाग आढळून न आल्याने चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मोहम्मद गुलाम हुसेन इराणी याच्याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो दिवसा चोरी करत असल्याचा आणि रात्री एमडी ड्रग्सची विक्री करत असल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे आठ लाख रुपये किमतीचा एमडी अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईमुळे इराणी वस्तीत सुरू असलेल्या कथित गुन्हेगारी कारवायांना मोठा धक्का बसला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण पोलिसांनी राबवलेल्या या धडक कोंबिंग ऑपरेशनमुळे परिसरात पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »