महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय लोकप्रिय बातम्या

सत्ता परिवर्तन करा, तरच मराठवाड्याचा विकास होईल -ॲड. प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

औरंगाबाद/प्रतिनिधी – आपल्याला मराठवाड्याचा विकास करायचा असेल, तर सत्तापरिवर्तन झाले पाहिजे. सत्तापरिवर्तन झाले, तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद येथील सभेत व्यक्त केला. ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादीचे अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार यांचे उमेदवार पाहिले, तर एकाच समाजाचे आहेत. ते नात्यागोत्यातील देखील आहेत हे आपण लक्षात घ्या. ते सर्व मराठा समाजाचे आहेत. जरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठा समाज जो आहे त्यातील एकही उमेदवार यांनी दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, काल मोदी म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर उपकार आहेत म्हणून उध्दव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन आणि पाहिजे ती मदत करेन. ही उद्याच्या राजकारणाची नांदी आहे. वाटाघाटी चालल्या तेव्हा मी म्हणालो होतो की, आपण सेक्युलर मतांवर निवडून येणार आहोत. त्यामुळे त्यांना आश्र्वासित करू की, पुन्हा पाच वर्षे भाजपसोबत समझोता करणार नाही.

ॲड. आंबेडकरांनी या वेळी एमआयएमला देखील सुनावले. ते म्हणाले की, ओवैसी असतील किंवा इतर कोणी असेल त्यांना सांगतो की, युती केल्यानंतर युतीचा धर्म पाळावा लागतो. तो पाळता येत नसेल, तर युती आघाडी करू नका.

चंद्रपूरमधील उमेदवार धानोरकर यांनी स्टेटमेंट असे केले की, आमदारकीची सत्ता, जिल्हा परिषदेची सत्ता, खासदारकीची सत्ता ही कुणबी समाजाकडेच असली पाहिजे. चंद्रपूरमधील या उमेदवार आता तिसऱ्या क्रमांकावर गेल्या आहेत. एकजातीय राजकारण यशस्वी होत नाही या मुद्द्याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले.

Related Posts
Translate »