महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकल बातम्या

ठाणे लोकसभेत छाननीअंती २५ उमेदवारांचे ३२ नामनिर्देशनपत्रे वैध, ११ अर्ज अवैध

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी– 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शनिवार दि 4 मे 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर 25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये -धुळे यांनी दिली आहे.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 3 मे 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांनी एकूण 43 अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जांची शनिवार, दि. 4 मे 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे 25 ठाणे लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक श्री. जे. श्यामला राव (आयएएस) हे उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची 25 ठाणे लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी छाननी केली.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात वैध ठरलेले उमेदवार :-

  1. राजन बाबूराव विचारे- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (एकूण 4 अर्ज)
  2. मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारी – अपक्ष (एकूण 2 अर्ज)
  3. डॉ. पियूष के. सक्सेना – अपक्ष
  4. झा सुभाषचंद्र – सरदार वल्लभभाई पार्टी
  5. सुरेंद्रकुमार के. जैन – अपक्ष
  6. अर्चना दिनकर गायकवाड – अपक्ष
  7. राहूल जगबीरस‍िंघ मेहरोलिया – बहुजन रिपब्ल‍िकन सोशालिस्ट पार्टी
  8. चंद्रकांत विठ्ठल सोनावणे – अपक्ष
  9. राजेंद्र रामचंद्र संखे – भारतीय जवान किसान पार्टी
  10. राजीव कोंड‍िबा भोसले – अपक्ष
  11. विजय ज्ञानोबा घाटे – रिपब्ल‍िकन बहुजन सेना
  12. खाजासाब रसुलसाब मुल्ला – अपक्ष
  13. उत्तम किसनराव तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)
  14. भवरलाल खेतमल मेहता – हिंदू समाज पार्टी
  15. गुरूदेव नरसिंह सूर्यवंशी – अपक्ष
  16. संभाजी जगन्नाथ जाधव – अपक्ष
  17. प्रमोद आनंदराव धुमाळ – अपक्ष
  18. सिद्धांत छबन श‍िरसाट – अपक्ष
  19. नरेश गणपत म्हस्के – शिवसेना (एकूण 4 अर्ज)
  20. संतोष भिकाजी भालेराव – बहुजन समाज पार्टी
  21. संजय मनोहर मोरे – अपक्ष
  22. मुकेश कैलासनाथ तिवारी – भीमसेना
  23. सावळे दत्तात्रय सिताराम – अपक्ष
  24. सलिमा मुक्तार वसानी – बहुजन महापार्टी
  25. इरफान इब्राहिम शेख – अपक्ष

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात अवैध ठरलेले उमेदवार:-

  1. आतिकूर रेहमान शेख – भारतीय राष्ट्रीय पार्टी
  2. अजय तुळशीराम मगरे- अपक्ष
  3. अब्दुल रेहमान शकील खान – अपक्ष
  4. जयदीप विनयकुमार कोर्डे – अपक्ष
  5. संतोष रघुनाथ कांबळे – अपक्ष
  6. प्रशांत रघुवीर अहिरवार – अपक्ष
  7. जुबिन रज्जाक पटवे – अपक्ष
  8. सुनील श‍िवाजी राठोड – राष्ट्रीय मराठा पार्टी
  9. रामेश्र्वर सुरेश भारद्वाज – हिंदुस्थान मानव पक्ष
  10. मोहम्म्द इक्बाल मोहम्मदअली बाशे – अपक्ष
  11. डॉ. रामराव तुकाराम केंद्रे – वंच‍ित बहुजन आघाडी अर्ज केलेल्या उमेदवारांना 6 मे 2024 पर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार आहे.
Related Posts
Translate »