महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकप्रिय बातम्या

डोंबिवली येथे कोविड आरोग्य केंद्र,कल्याण येथे कोविड टेस्टिंग सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी

डोंबिवली – कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. 
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोरोना संकटात  महाराष्ट्र शासन खंबिर आहे. आरोग्याच्या  सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच  व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी  एकत्रित दर्जेदार  सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या.केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था  तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर  देण्यास सांगितले.संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण  या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत.कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची  तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा आणि साथीचे प्रमाण व्यस्त आहे.  प्रभावी औषधे हातात येईपर्यंत आपल्याला अधिक सजग असणे आवश्यक आहे. गलथानपणा, ढिलाई आपल्याला परवडणारी नाही. आपल्याकडे सुरु असलेल्या  उपचारांची गाईडलाईन तपासुन घेणे आवश्यक आहे. राज्याच्या टास्कफोर्स कडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.या संकटात सर्व यंत्रणा  न डगमगता  पाय रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन  ते म्हणाले की,संपूर्ण राज्यात जेथे  आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य देण्यात येईल. कोरोना व्हायरसला हरविणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असले तरी आपण एकजुटीने त्यावर मात करु असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.कोरोनाच्या बाबत नागरिकांच्या मनातील भय दुर करण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याबरोबरच  समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + 4 मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत 70 बेड त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून दुस-या मजल्यावर काम करणारेम डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिस-या मजल्यावरती 5000 स्के.फीट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड व 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणाव रहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर ,50परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.
कोविड आरोग्य केंद्र कल्याण

कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोव्हिड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84नार्मल बेड ,10सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटर मध्ये 12 डॉक्टरर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्ड बॉय आणि फिजीशियन देखील उपलब्ध असतील
कल्याण येथे सुसज्ज प्रयोगशाळा
कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज 3000 चाचण्या होवू शकतात.यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोरोनाची आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा अज्ज असून येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू तसेच उत्तम सुविधांची उभारणी करू असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबीवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे.  महापालिका व लोकप्रतिनिधी एकत्र मिळुन  काम करतायेत त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो आहे असे सांगितले. तसेच महापालिकांना अर्थिक मर्यादा आहेत परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या सुविधा   उपलब्ध होत आहेत. ट्रँकींग व ट्रेसिंगवर विशेष भर देण्यात येत असुन येथिल नागरिकांना सर्व सुविधा कल्याणमध्येच उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही श्री शिंदे यांनी  सांगितले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,मनसे  आमदार प्रमोद (राजू ) पाटील,विश्वनाथ भोईर, भाजप रवींद्र चव्हाण महापौर विनिता राणे,सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे,विरोधी पक्ष नेते राहुल दामले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.

Related Posts
Translate »