नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना फुल उत्पादक शेतकरी व व्यापरी मात्र चिंतेत आहे. फुलांचे दर घसरल्याने फुलांच्या बाजारात नाराजी दिसून आली. छत्रपती संभाजीनगर, शहरातील सिटी चौक फुल बाजारपेठेमध्ये आज मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाल्याने फुलांचे भाव घसरले आहे.
जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून सध्या गणेश मंडळांनी शेतकऱ्यांच्या फुलां कडे काना डोळा केला आहे. गणेश मंडळांनी प्लास्टिकच्या फुलांचा सर्रासपणे वापर केल्यामुळे शेतकऱ्यांची फुले कवडीमोल भावात विक्री होत असून काही फुले खराब होऊन फेकली सुद्धा जात आहेत.
अशा परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी गणेश मंडळांना आवाहन केले आहे की शेतकरी हा आपल्या शेतामध्ये पीक घेतो फुलांना जोपासतो आणि वाढ करतो तर या शेतकऱ्यांकडून आपण फुले खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि गणेश उत्सवांमध्ये खऱ्या फुलांचा वापर होईल. त्यातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
फुल बाजारपेठेमध्ये 40 ते 50 रुपये झेंडूची फुले, शेवंतीची तीस ते चाळीस रुपये ,.गलांडा 40-50 रुपये प्रति किलो दराने विक्री झाला याच फुलांची दोन दिवसांपूर्वी किंमत शंभर रुपये प्रति किलो होती
दोन दिवसांपूर्वी त्यांना चांगला भाव होता महालक्ष्मीचे पूजन झाल्यानंतर 30, 40 रुपयावर मार्केट डाऊन झालं .सध्या बाजारपेठेमध्ये कृत्रिम फुले पुढे आल्यामुळे नैसर्गिक फुलांची खरेदी कमी झालेली आहे. दोन दिवसाच्या पावसामुळे फुलांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सरासरी या वर्षी पीक कमी आलं आणि शेतकऱ्यांना भावही मिळाला नाही आणि येनवेळी पाऊस पडल्यामुळे सीझनमध्ये नुकसान झालं. सण उत्सव असूनही बाजारपेठेमध्ये गिऱ्हाईक नाही. खऱ्या फुलांना काहीच किंमत नसल्याचे व्यापारी व शेतकरी यांनी सांगितले.



