नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – अपुऱ्या पावसाने खरीप हंगामाचे पिक लावून परतीच्या पावसाची वाट पाहत शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून लावलेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. असेच संकट नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आले आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.या रोगामुळे सोयाबीनचे पीक पूर्णतः पिवळे पडले आहे.
सोयाबीनच्या पिकाला शेंगा देखील लागल्या नसल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांनी बँकेचे लोन घेऊन शेती केली 16 एकर वरती सोयाबीनची शेती केली असून गावातील 80 टक्के सोयाबीन हे खराब झाल्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.



