नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – मराठा समाज आरक्षण आंदोलनातील उपोषणकर्ते मनोज दरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरांगे पाटील म्हणाले, सरकारला वेळ दिला तरी आंदोलन सुरुच राहणार.गाड्या आडवल्याने आरक्षण मिळणार नाही. आपली लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. चाळीस वर्षें दिली, आणखी एक महिना देऊन पाहू.
आरक्षणाचे पत्र मिळेपर्यंत थांबणार नाही. मी चर्चा करतो पण निर्णय तुमच्या हातात. आंदोलकावरचे सर्व गुन्हे मागे घ्यावे व ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई करा. आंदोलन संपवले तर आपल्याला गुंडाळून टाकतील.मराठा आरक्षणासाठी झिजतोय मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही.जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझं घर, लेकरांचे तोंड पाहणार नाही.
सरकारला आता एक महिन्याचा वेळ दिला आहे. जातीची बदनामी नको म्हणून वेळ दिला आहे. जर आरक्षण नाही तर महाराष्ट्राची बॉर्डर सुद्धा क्रॉस करण्याची ताकद आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ आणि खा. उदयनराजे भोसले हे सगळे जालना येथे उपोषण सोडताना आले पाहिजे. सरकार आणि आमच्या मध्ये दोन्ही राजे पाहिजे.



