नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणातील पत्रकार कुणाल म्हात्रे यांना कल्याण मधील सर्वात जुन्या “रोटरी क्लब ऑफ कल्याण”चे मानद सदस्यत्व रोटरीचे जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष राम मराठे, सचिव अरुण सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळी कल्याण पश्चिमेतील रोटरी सभागृह, सार्वजनिक वाचनालय याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
कुणाल म्हात्रे हे गेल्या १२ वर्षांपासून विविध वृत्तपत्रात पत्रकारिता करत आहेत. ते कल्याण डोंबिवली पत्रकार संघ कार्याध्यक्ष, प्रेस क्लब कल्याण उपाध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट कार्यकारणी सदस्य, प्रेस असोसिएशन कल्याण डोंबिवली कार्यकारणी सदस्य आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या वतीने त्यांना मानद सदस्यत्व प्रदान केलं आहे.
जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित सदस्यांना रोटरी क्लब बाबत माहिती सांगत आगामी काळात कोण कोणते प्रकल्प कशाप्रकारे राबविता येतील याबत मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक कामे डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत रोटरी क्लब पोहचविण्याचे आवाहन केले.
यावेळी रोटरी जिल्हा प्रथम महिला माधवी कुलकर्णी, माजी अध्यक्ष दिलीप कर्डेकर, सुषमा पटेल, स्मृति पवार, रोहीणी बाऊसकर, सुदीप सोपारकर, दीपक पटेल, अशोक खंडेलवाल, जय राठोड आदि जण उपस्थित होते. दरम्यान यावेळी जयश्री कर्डेकर, प्रियंका मराठे यांना नवीन सदस्यत्व देण्यात आले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पराग कापसे यांनी केले.