नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – २०१४ पासून देशामध्ये असलेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला असता देशात एकहाती सत्तेची सूत्रे बदलणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय पक्ष एकत्र येवून संघटन होणे गरजेचे होते. ह्यातूनच सर्वपक्षीय संघटन झाले असून इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट व १ सप्टेबर रोजी मुंबईत बैठक आयोजित केली आहे. ह्या बैठकीसाठी देशातील दिग्गज नेते मुंबईत यायला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत पोहोचले आहेत. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, शिवसेना आ. सचिन अहिर, यांनी त्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले.



