महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

सोशल मिडियावाद, मुलाची अर्ध नग्न धिंड कढून मारहाण करणाऱ्या १२ जणांना अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी -कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७  वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधानावर कमेंट केली होती. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शोध घेतला. त्याला शोधून काढलं आणि त्याला शुक्रवारी त्याची अर्ध नग्न धिंड काढून  मारहाण केली होती या प्रकरणी खडक पाडा पोलिसांनी १२ आरोपीना अटक केली आहे. तीन तरुणीना कल्याण कोर्टात हजर करून त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण करुन त्याची अर्धनग्न धिंड काढल्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ५ आरोपींना यापूर्वी अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तीन महिलांना अटक करण्यात आलं आहे. या तिन्ही महिलांची रवानगी कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडीत केली आहे. या प्रकरणात अजून दहा ते बारा आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात तिन्ही महिलांना कल्याण न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आठ आरोपींना अटक केली आहे. तसेच चार अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेऊन पुढची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तीन तरुणीचा  समावेश आहे. तर चार तरुण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इन्स्टाग्रामवर जोरदार वाद सुरु होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७  वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधानावर कमेंट केली होती. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शोध घेतला. त्याला शोधून काढलं आणि त्याला शुक्रवारी मारहाण केली. त्याला अर्धनग्न करुन जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नव्हे तर आक्षेपार्ह विधान आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिढीताची खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे .

या प्रकरणाचा तपास कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील करत आहेत. याप्रकरणी त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत. काही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुढील तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. कायदेशीर कारवाई पोलीस करीत आहेत.त्याच प्रमाणे एसीपी उमेश माने पाटील यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे कि नागरिकांनी कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करु नये. अफवांवर विश्वास ठेवून नये. आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास पोलिसांना कळवावे कायदा हातात घेऊ नये, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी कल्याण पोलिसांच्यावतीने उमेश माने पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण यांनी दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »