मुंबई/प्रतिनिधी – ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट बद्दल अंदाज कोणालाही येत नाहीये. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं अस आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जनतेला केले आहे .
आपण घरून बाबासाहेबांना आभिवादन करू शकता किवा आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया असेही बाळासाहेब आंबेडकर यांनी सागितले.
Related Posts



