महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

डोंबिवलीतील सतरा विद्यार्थ्यांची बालचित्रकला प्रदर्शनासाठी निवड

डोंबिवली/प्रतिनिधी – कला साहित्य शिक्षण मनोरंजन संस्कृतीची पंढरी व महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून डोंबिवलीचा गौरव होतो हे डोंबिवलीतील बालकलाकारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले एस .पी. मेमोरियल ट्रस्ट मुंबई आयोजित बाल दिनानिमित्त नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मुंबई येथे होणाऱ्या 33 व्या बालचित्रकला प्रदर्शनासाठी डोंबिवलीत 17 बाल कलाकारांची निवड झाली या बाल कलाकारांची चित्रे सुंदर आकर्षक व्हावी सर्व कलाकृतींची प्रदर्शनात एक वेगळी छाप पडावी या उदात्त हेतूने श्रीमती के. सी. गांधी शाळेचे चित्रकला शिक्षक अमोल पाटील यांनी या मुलांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले व सतत आठ दिवस विनामूल्य मार्गदर्शन करून प्रत्येक मुलाकडून एकापेक्षा एक अशा कलाकृती निर्माण करून घेतल्या विद्यार्थ्यांनी कॅनवास बोर्ड वरती ऍक्रेलिक रंगाच्या माध्यमातून डोंगर-दऱ्या ,नदी-नाले रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले झाडे ,सूर्योदय व सूर्यास्ताच्या रंग छटांनी आकाशाला आलेले आनंदाचे उधाण या रंगछटांचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब, खडखड वाहणारी नदी, सर्वत्र हिरवा शालू नेसलेली सृष्टी अशी सुखद मनाला साद घालणारी एकापेक्षा एक सुंदर निसर्गचित्रे चितारली तर काही मुलांनी वारली पेंटिंग, मधुबनी पेंटिंग, मॉडर्न आर्ट ,अशा विविध विषयावर 51 कलाकृती साकारल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंदी भाव चैतन्य रुपी उत्साह झळकत होता सर्व मुलांच्या कलाकृतीत नाविन्यपूर्ण रचना, रंगलेपन, रंगसंगती असल्याने सर्वच मुलांची चित्रे मनाला सुखद साद घालतात हे बालचित्र प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे 9 ते 14 नोव्हेंबर पर्यंत सुरू असेल

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »