महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांना केंद्राचे ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि तपासातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर पोलीस शिपायापासून सहाय्यक पोलीस आयुक्तपदापर्यंत मजल मारणारे अशोक होनमाने यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी त्यांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’ने गौरविले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी ठाणे पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील घानंद या ग्रामीण भागातून आलेल्या अशोक होनमाने यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आपल्या करिअरला आकार दिला. गावातील शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
१९८९ मध्ये पोलीस शिपाई म्हणून मुंबई पोलीस दलात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पोलीस कारकिर्दीला सुरुवात झाली. नोकरी सांभाळत त्यांनी रात्र महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. पुढे MPSC परीक्षेची तयारी करून १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून अधिकारी पदावर प्रवेश केला.
त्यानंतर मुंबई, दहिसर, नवी मुंबई, पालघर, माणिकपूर, भिवंडी आणि कल्याण अशा विविध ठिकाणी त्यांनी पोलीस सेवेत जबाबदाऱ्या पार पाडल्या. महात्मा फुले पोलीस ठाण्यासह अनेक ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सध्या ते कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा माग काढणे आणि आव्हानात्मक प्रकरणांचा छडा लावण्यात होनमाने यांचे विशेष कौशल्य मानले जाते. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि तपासातील बारकावे हेरण्याची हातोटी यामुळे त्यांनी पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली.
शिपाई म्हणून सुरू झालेली सेवा, अधिकारी पदावरील जबाबदाऱ्या आणि आता सहाय्यक पोलीस आयुक्तपदापर्यंतचा प्रवास हा त्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची साक्ष देणारा आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’मुळे त्यांच्या सेवेला राष्ट्रीय स्तरावर गौरवाची पावती मिळाली असून, त्यांच्या या सन्मानाचे पोलीस वर्तुळातून कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »