महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर महत्वाच्या बातम्या

रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन

प्रतिनिधी.

मुंबई – माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर नियोजित शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी विभागाने त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

कोकण विभागासाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव परिसरात शासकीय विधी महाविद्यालय सुरु व्हावे, अशी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी व पालक यांची मागणी होती. त्यास अनुसरुन विधी व न्याय राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी विधी व न्याय राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, उच्च व तंत्र शिक्षण संचालक श्री.माने, सह संचालक संजय जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या मौजे जावळी ता. माणगाव येथे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या सुमारे 4 हेक्टर शासकीय जमिनीवर शासकीय विधी महाविद्यालयाची स्थापना झाल्यास रायगड व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शिवाय महाविद्यालयासाठी आवश्यकतेहून अधिक जागा उपलब्ध असल्याने भविष्यात होणाऱ्या महाविद्यालयीन विस्तारासाठी या जागेचा उपयोग होऊ शकेल.

या बैठकीच्या अनुषंगाने सह संचालक, उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय यांनी सदर जागेची तातडीने पाहणी करुन विभागामार्फत प्रस्ताव सादर करावा, तसेच जावळी ता. माणगाव येथे शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी संबंधितांना  दिले.

Related Posts
Translate »