महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकल बातम्या

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/AgEEYcYfMV4

कोल्हापूर –  शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हीच आमची भूमिका आहे. यासाठी मुंबईत बैठक घेऊन योग्य मार्ग काढू असे आश्वासन ना. सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी याना दिले. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी गेल्या चार दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यलयाबाहेर सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला ना. सतेज पाटील यांनी भेट दिली. 

महावितरणच्या कार्यालयातील सावळा गोंधळ थांबवा, शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसाचा वीजपुरवठा सुरू करा या मागणीसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज ना. सतेज पाटील यांनी सुरु असलेल्या आंदोलणाला भेट दिली. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची भूमिका आमची असून यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत अधिकाऱ्यांच्यासोबत  बैठक घेऊन योग्य मार्ग काढू, शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन असून शेट्टी यांनी बैठकीला उपस्थित राहावे असे सांगितले.

दरम्यान, ना. हसन मुश्रीफ यांनीही आंदोलन स्थळाला भेट दिली. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक, सचिव आणि उर्जा मंत्री नीतीन राऊत यांचेसोबत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यासाठी बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली.  मात्र, महापुराच्या काळातील राज्य शासनासोबतच्या बैठकीचा अनुभव चांगला न आल्याने जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे पाणी आणि विजेचा अपव्यय होतो. रात्रीच्या वेळी संपासह अनेक वन्यप्राणी येत असतात, त्यांच्यापासून शेतकऱ्यांना धोका निर्माण होतो. त्यामुळे रात्रीचा वीज पुरवठा नकोच अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी ना. हसन मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांच्याकडे केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »