महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मनोरंजन लोकप्रिय बातम्या

बार्डो चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

दिल्ली प्रतिनिधी – 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘ताजमाल’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.

‘बार्डो’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला  आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे आहेत. हा चित्रपटाचे निर्माते रितु फिल्मस् कट एलएलपी आहेत. याच चित्रपटातील ‘रान पेटला…’ या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचाही पुरस्कार जाहीर झाला आहे.  प्रोडक्शन डिझाइन  सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.

राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला जाहीर झाला आहे.  हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर टूलाईन स्टुडिओ प्रा.लि. यांची निर्मिती आहे.

‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.  उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘कस्तुरी’ या हिंदी सिनेमाला जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आहेत तर इनसाईट फिल्मसची निर्मिती आहे.

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार

‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रिएशनने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहेत. तर राज प्रितम मोरे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे.

सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत  ‘होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.

स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार जाहीर

स्पेशल मेन्शन या श्रेणीत ‘लता भगवान करे’ या मराठी सिनेमाच्या अभिनेत्री लता करे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याच श्रेणीत ‘पिकासो’ या सिनेमाला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.

सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रटाचा पुरस्कार ‘अनु रूवड’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते  ओबो नोरी पिक्चर आहेत तर दिग्दर्शक दिलीप कुमार डोले हे आहेत.

‘त्रिज्या’ या सिनेमाला  उत्कृष्ट ऑडिओग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

चित्रपटांवरील उत्कृष्ट समीक्षात्मक पुस्तक या श्रेणीत  ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला   स्पेशल मेन्शन पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »