महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम शिक्षण

मुक्त विद्यापीठातर्फे एमबीए, एमसीए, बीसीए व बी. एस्सी. डाटा सायन्ससाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

DESK MARATHI NEWS.

नाशिक/प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता एमबीए, एमसीए, बीसीए व बी. एस्सी. डाटा सायन्स या शिक्षणक्रमांची प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार या सर्व शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी संबंधित प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. एमबीए प्रवेशासाठी दिनांक १९ जुलै २०२५ तर एमसीए, बीसीए व बी. एस्सी. डाटा सायन्स या शिक्षणक्रमांसाठी दिनांक १३ जुलै २०२५ ही अंतिम मुदत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे. 

एमबीए शिक्षणक्रमासाठीचे ऑनलाइन प्रवेश २० जून २०२५ पासून सुरू झाले आहेत. त्याची प्रवेश परीक्षा नोंदणी दिनांक १९ जुलै २०२५ पर्यंत उपलब्ध असेल. प्रवेश परीक्षा ही दिनांक २० जून २०२५ ते २१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. ही परीक्षा १०० गुणांची असून, प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील आणि नकारात्मक गुणांकन (निगेटीव्ह मार्किंग) पद्धत लागू राहणार नाही. एकूण ६० पैकी ५० प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. परीक्षेचा कालावधी जास्तीत जास्त ६० मिनिटे असेल. प्रवेश परीक्षा शुल्क रु. ६००/- असून, अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा रु. ६००/- शुल्क भरून परीक्षा देता येईल. एमसीए, बीसीए व बी. एस्सी. डाटा सायन्स या शिक्षणक्रमांसाठीचे प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी दिनांक १३ जुलै २०२५ पर्यंत २४ तास उपलब्ध असेल. प्रवेश परीक्षा ही दिनांक १७ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. एकूण १०० गुणांसाठी प्रत्येकी दोन गुणांचे ५० प्रश्न विचारले जातील आणि सर्व ५० प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. परीक्षेचा कालावधी जास्तीत जास्त ५० मिनिटे असेल. प्रवेशास पात्र होण्यासाठी किमान ४० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा शुल्क रु. ५००/- असून, तीन प्रयत्नात अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा रु. ५००/- शुल्क भरून परीक्षा देता येईल. नोंदणीसाठी https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकचा वापर करावा.

उमेदवारांनी नोंदणी करण्यापूर्वी संबंधित माहितीपुस्तिकेमध्ये नमूद केलेली शिक्षणक्रमाची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करावी, नोंदणी केल्यानंतर उमेदवारास सराव परीक्षा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतरच प्रवेश परीक्षा देता येईल. प्रवेश घेताना इतर शैक्षणिक कागदपत्रांसह प्रवेश परीक्षेत पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक राहील. परीक्षेसंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक ८०५५२५३०७२, ७४४७४५७१९४ वर संपर्क साधावा. देयका (पेमेंट) संदर्भात ycmou_support@unisuite.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला www.ycmou.ac.in किंवा https://ycmou.digitaluniversity.ac भेट द्यावी, वरील दोन्ही प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी केले आहे. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »