DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शहीदांचा दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी सरकारकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केली.रविवार 27 तारखेला डोंबिवलीतील पीडित यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.केंद्र सरकारकडून केवळ 370 कलम हटवल्याचा ढोल बडवला जात असला तरी काश्मीरमध्ये आजही पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद्यांचे वर्चस्व दिसत असल्याची गंभीर टिका करत या दहशतवाद्यांना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.



