महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

मुंबई डीआरआयचा लातूरमध्ये छापा, 17 कोटीचे मेफेड्रोन जप्त तर सात जणांना अटक

DESK MARATHI NEWS.

मुंबई/प्रतिनिधी -मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या समन्वयाने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या एका छुप्या मेफेड्रोन उत्पादन कारखान्यावर छापा टाकला. 1985 च्या अंमली पदार्थ आणि मनस्थितीवर परिणाम करणारे घटक (एनडीपीएस) कायदा अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या मेफेड्रोन या सायकोट्रॉपिक पदार्थाच्या बेकायदेशीर उत्पादनात सहभागी असलेल्या एका सिंडिकेटबद्दलच्या विशिष्ट गुप्त माहितीवरून कारवाई करताना, डीआरआय अधिकाऱ्यांनी परिसरात सतत देखरेख ठेवली. 8 एप्रिल 2025 च्या पहाटे, संशयित ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत 11.36 किलो मेफेड्रोन (8.44 किलो कोरड्या स्वरूपात आणि 2.92 किलो द्रव स्वरूपात), तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि या पदार्थाच्या निर्मितीत वापरली जाणारी मोठ्या-प्रमाणात प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त करण्यात आली.

छुप्या पद्धतीने मेफेड्रोनच्या उत्पादनात थेट सहभागी असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलसह पाच जणांना अटक करण्यात आली. जलद आणि समन्वित पाठपुरावा करताना, वित्तपुरवठादार आणि वितरक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणखी दोघांना मुंबईत अटक करण्यात आली.या सातही जणांनी मेफेड्रोनच्या वित्तपुरवठा, उत्पादन आणि तस्करीमध्ये आपली भूमिका कबूल केली आहे. अवैध बाजारात सुमारे 17 कोटी रुपये किंमत असलेले 11.36 किलो मेफेड्रोन, कच्चा माल आणि उपकरणे यांचा समावेश असलेली एकूण जप्ती एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार करण्यात आली.


 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »