नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
जळगाव/प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. परंतु अनियमित पाऊस झाल्याने आणि पावसाच्या खंडानंतर वादळी आणि जोरदार पाऊस झाल्याने फुलाची फुगडी गळून गेली. आता कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कापसाचे येणारे उत्पन्न त्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. लागलेला खर्च तो देखील निघणार नाही कापसाला भाव देखील नाही ,मजूर मिळत नसल्याने तो देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे.
मोठ्या प्रमाणावर मजूर लावून देखील कापसाचे उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणावर येत नाही. पिक विमा काढून पंचनामे झाले. परंतु अजून देखील त्याची भरपाई मिळाली नाही, शेतकरी आता कापूस उपटून रब्बीची पेरणी करताना दिसत आहे. खरिपामध्ये काही उत्पन्न नाही आलं तर रब्बीच्या हंगामात काहीतरी उत्पन्न येईल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे.



