नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहण्यात सुरुवात होताना दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या परीने तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहेत. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील कंबर कसलेली दिसून येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने नवी मुंबई मध्ये “होऊ दे चर्चा” कार्यक्रमाचे आयोजन तुर्भे सेक्टर 21 मध्ये करण्यात आले होते. नवी मुंबई मध्ये ही 62 वी सभा असून आज सभेचा शेवटचा दिवस आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्राभर होऊ द्या चर्चा ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजप सरकारने जी आश्वासने दिली, त्यातले एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचे सांगत 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली असल्याचे उबाठा पक्षाचे नवी मुंबई चे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी सांगितले.



