नेशन न्यूज मराठी टीम.
बीड/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने देशात व राज्यात नितीहिन,भ्रष्ट,देश विक्री करू पाहणारे तथा देशात आराजकता व गुलामी व्यवस्था निर्माण करू पाहणारे देशात राज्यात खाजगीकरण कंत्राटी पद्धतीने आणण्याचा घाट घातलेला आहे. जो लोकशाहीला देशाच्या एकात्मतेला,स्थिरतेला, घातक, व बाधक ठरनारा आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला लोकशाही व घटनात्मक तरतुदीची अमलबजावनी करावी व खाजगीकरण, कंत्राटी पद्धतीने भरतीचा शासन निर्णय रद्द करावा , जिल्हा परीषद शाळांचे खाजगीकरण रद्द करावे यासाठी खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
१) कंत्राटी नोकर भरतीचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७/ प्र.क्र.९३/कामगार-८६/०९/२०२३ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा.
2)केजी टू पीजीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे.
३)सरळसेवा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एस टी व रेल्वे प्रवास मोफत करण्यात यावा.
४)सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे अवाजवी शुल्क बंद करून सरसकट सर्वांना परीक्षा शुल्क 100 रुपये आकारण्यात यावे.
५)महाराष्ट्र राज्याच्या 62 हजार सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण करणारा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०३/प्र.क्र.४४/एसडी-६ १८/०९/२०३ चा शासन निर्णय रद्द करा.
तरी आमच्या मोर्चाच्या मागण्याचा विचार करून कंत्राटी पद्धतीने भरतीचा जी आर रद्द करावा तसेच जिल्हा परीषद शाळांचे खाजगीकरनाचा शासन निर्णय रद्द करावे हि विंनती.
यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.



