महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे – संजय राऊत

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे. कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आम्हाला सर्वांना खात्री आहे की घटनेनुसार काम झालं. निर्णय लागला तर सुरुवातीचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि त्यानंतर हे सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे आणि हे सरकार कोसळल तर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात म्हणून हे बजेट सादर केलं. बजेटवर बोलताना खासदार संजय राउत यांनी आपली तिखट आशी प्रतिक्रिया केली.
हा डरपोकपणा आहे आम्ही रोज सांगतो निवडणुका घ्या विरोधी पक्ष कधीच सांगत नाही की निवडणुका घ्या आणि एकदा आमने-सामने होऊ द्या शिवसेना कोणाची महाराष्ट्र कोणाचा हा फैसला होऊन जाऊ दे. निवडणुकावर बोलताना अशा प्रकारे त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले

शेतकर्याच्या खातावरून माध्यमांनी प्रश्न विचारला असता राउत म्हणाले कि महाराष्ट्रात सध्याच्या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारने जात आणि धर्मावर राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात दाखवाल अशा प्रकारचा जात दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असेल तर शेवटी महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल.

आज ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे शिवसेना प्रत्येक तहसील कार्यालयावरती जाऊन आंदोलन करणार आहे. तात्काळ पंचनामे करा, तात्काळ मदत करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असाही राउत यांनी सरकारला इशारा दिला

राज ठाकरे यांच्यावर भाष्य करताना रूट म्हणले कि कुणी कुणाच्या वाटेला गेलं नाही. त्यांच्या वाटेला जाणे इतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार मुख्यमंत्रीपद का गेलं हे पुर्ण जगाला माहित आहे. त्यांना जर माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची अजून व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे सरकार हे फक्त ईडी सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके.इडीचा अनुभव हा त्यांनी चांगल्या प्रकारे घेतला आहे.

कसब्याच्या निकालात जनता कुठे गेली हे दिसलं नेत्यांचं काय घेऊन बसलात काल महाविकास आघाडीची बैठक झाली. सगळ्यांनी काही भूमिका आणि निर्णय ठरवले आहेत आणि ते असे आहेत की कोणत्याही परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा या एकत्रित मजबुतीने लढायच्या आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवायची हे ठरला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षाची अधोगती कशी चालली आहे यावर लक्ष द्यावं. असे बोलत राउत यांनी प्रतीउत्तर दिले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »