महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

जो पर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देत नाही,तो पर्यंत विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही- खा. सुरेश म्हात्रे यांचा केंद्र सरकारला इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK.

भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार बरोबरच इतर राजकीय पक्ष, संघटना व स्थानिक भूमिपुत्र सकारात्मक असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल व वेळकाढू पणा करत आहे. मात्र जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यात येत नाही तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे.बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकनेते स्व.दि.बा.यांचे समाज कार्य केवळ नवी मुंबई किंवा ठाणे पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हते तर दि.बा.पाटील यांच्यामुळे देशात स्त्री भ्रूण हत्या कायदा पारीत झाला,प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीच्याया बदल्यात जमीन अथवा भरीव मोबदला देण्याचे कार्य देखील त्यांनी केले असून देश स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी कुळ कायदा करण्यासाठी इंग्रजांविरोधात आंदोलन केले यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती,देश स्वातंत्र्यानंतर कुळ कायदा मंजूर झाला ज्याचा फायदा आज देशातील सर्व शेतकऱ्यांना होत आहे.ओबीसी आरक्षणासाठी देखील दि.बा.पाटील यांचे मोठे योगदान आहे.दि.बा.पाटील हे पाच वेळा आमदार,दोन वेळा खासदार,राज्याच्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते असा त्यांचा राजकीय,सामाजिक व कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे.ते केवळ ठाणे पालघर जिल्ह्या पुरती मर्यादित नसून एक थोर समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडे पहिले पाहिजे आणि त्यासाठीच नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव द्यावे अशी आमची मागणी असल्याची माहिती खा.बाळ्या मामा यांनी दिली आहे.
रविवारी १४ सप्टेंबर रोजी लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव मिळावे यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गाव अशी भव्य कार रॅली काढण्यात आली असून या कार रॅलीत किमान दोन हजारांहून अधिक चार चाकी गाड्या असणार आहेत.या कार रॅलीत ठाणे,पालघर,रायगड,नवी मुंबई,मुंबई येथून हजारोंच्या संख्येने आगरी कोळी बांधव उपस्थित राहणार आहेत.हि कार रॅली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी असणार असून हा केवळ ट्रेलर आहे, आम्हाला पिच्चर दाखवायला भाग पाडू नका,जो पर्यंत विमानतळाला नाव देणार नाही तो पर्यंत विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही असा इशारा देखील खासदार बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »