महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
क्रिडा न्युजरूम

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालया कडून मागविली राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 साठी नामांकने

DESK MARATHI NEWS NETWORK.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा पुरस्कार (एनवायए) 2024 साठी नामांकने आमंत्रित केली आहेत. या पुरस्काराचे उद्दिष्ट तरुणांना (15 ते 29 वर्षे वयोगटातील) राष्ट्रीय विकास किंवा सामाजिक सेवेच्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रेरित करणे; तरुणांना समुदायाप्रती जबाबदारीची भावना विकसित करण्यास आणि अशा प्रकारे चांगले नागरिक म्हणून त्यांची स्वतःची वैयक्तिक क्षमता सुधारण्यास प्रोत्साहित करणे आणि राष्ट्रीय विकास आणि/किंवा सामाजिक सेवेसाठी तरुणांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याला मान्यता देणे हे आहे.

राष्ट्रीय युवा पुरस्कार सर्वसाधारणपणे राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान दिले जातात. हे पुरस्कार दोन श्रेणींमध्ये दिले जातात:

1. वैयक्तिक श्रेणी

2. संस्थात्मक श्रेणी

दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या सामान्यतः वैयक्तिक श्रेणीसाठी 20 आणि संघटना श्रेणीसाठी पाच पेक्षा जास्त नसावी. तथापि पात्रतेच्या बाबतीत मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विवेकबुद्धीनुसार हे प्रमाण बदलू शकते.

व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये पदक, प्रमाणपत्र आणि ₹ 1,00,000/- बक्षीस रक्कम असेल. स्वयंसेवी युवा संघटनांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये पदक, प्रमाणपत्र आणि ₹3,00,000/- बक्षीस रक्कम असेल.

राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 साठी https://awards.gov.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन नामांकने मागवण्यात आली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात येत आहे. तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आणि पात्रता निकष पोर्टलवर उपलब्ध आहेत.

आरोग्य, संशोधन आणि नवोन्मेष, संस्कृती, मानवाधिकारांचा प्रचार, कला आणि साहित्य, पर्यटन, पारंपरिक औषधे, सक्रिय नागरिकत्व, सामुदायिक सेवा, क्रीडा आणि शैक्षणिक उत्कृष्टता तसेच स्मार्ट लर्निंग यासारखे विकासात्मक उपक्रम आणि सामाजिक सेवेच्या विविध क्षेत्रांमध्ये युवा वर्गासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना त्यांचे नामांकन 30 सप्टेंबर 2025 पर्यंत https://awards.gov.in या पुरस्कार पोर्टलद्वारे सादर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे‌.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »