महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क महाराष्ट्र

संत निरंकारी मिशन मार्फत मुंबई महानगरात 50 पेक्षा अधिक ठिकाणी योग प्रशिक्षण

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी –  संत निरंकारी मिशन मार्फत आंतर्राष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून शनिवार, दि.21 जून रोजी सकाळी 6 वाजता भारतवर्षातील 1000 पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी ‘योग दिवस’ आयोजित केला जाणार आहे. मिशनच्या विविध शाखांमध्ये हे आयोजन स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या प्रांगणात किंवा उद्यानांमध्ये करण्यात येईल, ज्यामध्ये निरंकारी भक्तगण, सेवादल स्वयंसेवक व स्थानिक नागरिक उत्साहाने भाग घेतील.

मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 50 पेक्षा अधिक ठिकाणी यानिमित्ताने योग प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यामध्ये निरंकारी भक्तगणांसह इतर नागरिकांनीही सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक प्रबंधकांकडून करण्यात आले आहे. पावसाळी वातावरण लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेशात हे आयोजन मुख्यत्वे निरंकारी सत्संग भवनांमध्ये केले जाणार आहे.

संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिन्दर सुखीजा यांनी माहिती दिली, की 2015 सालापासूनच संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन द्वारे ‘योग दिवस’ नियमितपणे देशव्यापी स्तरावर आयोजित केला जात आहे. सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा या उपक्रमाचा सातत्याने विस्तार होत आहे. सतगुरु माताजींचे हेच मार्गदर्शन आहे, की ‘स्वस्थ मन, सहज जीवन’ त्यांच्या विचारांतून हे स्पष्ट होते, की मनुष्य तन ही ईश्वराची अनुपम देणगी आहे जी स्वस्थ आणि सशक्त बनवूनच मनुष्य आपल्या आध्यात्मिक व सामाजिक कर्तव्यांचा यथार्थ निर्वाह करु शकतो. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »