महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य न्युजरूम

कल्याणात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे मॅटर्निटी हॉस्पिटल सुरू

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर घालत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन आज कल्याणात करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

कल्याणातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. अश्विन कक्कर यांच्या पुढाकारातून हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळ मजला अधिक सात मजले अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल ४८ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलपैकी एक ठरले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला शस्त्रक्रिया कक्ष, लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे.

डॉ. अश्विन कक्कर यांना २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या जुन्या रुग्णालयात ४३ हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ७० टक्के प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी बोलताना डॉ. कक्कर म्हणाले की, या नव्या रुग्णालयासाठी आपल्याला कोविड काळात केडीएमसीचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रेरणा दिली. तर तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी जागेच्या अडचणी दूर केल्या आणि विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या वेळेत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे विक्रमी २६ महिन्यांत ही भव्य इमारत उभी राहू शकल्याचेही ते म्हणाले. या नव्या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना आधुनिक आणि आणखी सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »