महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश न्युजरूम

आयएनएस कवरत्ती वरून घेण्यात आल्यापाणबुडीविरोधी रॉकेटच्या यशस्वी चाचण्या

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – भारतीय नौदलाच्या आयएनएस कवरत्ती या युद्धनौकेवर 23 जून ते 07 जुलै 2025 या कालावधीत एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट (ईआरएएसआर), अर्थात विस्तारित पल्ल्याच्या पाणबुडीविरोधी रॉकेटच्या यशस्वी युजर ट्रायल (वापरकर्ता चाचण्या) घेण्यात आल्या. डीआरडीओच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), पुणे ने हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी आणि नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी यांच्या सहयोगाने भारतीय नौदलाच्या जहाजांच्या स्वदेशी रॉकेट लाँचरसाठी (आयआरएल) एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट (ईआरएएसआर) डिझाइन आणि विकसित केले आहे.

ईआरएएसआर हे पूर्णपणे स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट आहे, जे पाणबुडी विरोधात वापरले जाते आणि भारतीय नौदलाच्या जहाजांच्या आयआरएल (IRL) वरून  डागले जाते. अधिक अचूकता आणि सुसंगतता, यासह विस्तृत श्रेणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यामध्ये ट्विन-रॉकेट मोटर कॉन्फिगरेशन आहे. ईआरएएसआरमध्ये स्वदेशी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूजचा वापर करण्यात आला आहे.

एकूण 17 ईआरएसआरची विविध श्रेणींमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचण्यांमध्ये रेंज परफॉर्मन्स, इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज फंक्शनिंग आणि वॉरहेड फंक्शनिंग यासारख्या सर्व विशिष्ट उद्दिष्टांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड, हैदराबाद आणि सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड, नागपूर हे ईआरएएसआर रॉकेट्सचे उत्पादन भागीदार आहेत. युजर ट्रायल यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर भारतीय नौदलामध्ये लवकरच ईआरएएसआर प्रणालीचा समावेश होण्याची शक्यता आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि या प्रणालीचा विकास आणि चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या उद्योगांचे अभिनंदन केले आहे. भारतीय नौदलात ही यंत्रणा दाखल झाल्याने नौदलाची मारक शक्ती वाढेल, असे ते म्हणाले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनीही ईआरएएसआरचे डिझाइन आणि विकासामध्ये सहभागी झालेल्या पथकांची प्रशंसा केली.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »