महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम महाराष्ट्र

महावितरणच्या उपकेंद्रांसाठी गुणवत्तेसह सुरक्षेचेही ‘आयएसओ’ मानांकन घ्यावे – संचालक राजेंद्र पवार

DESK MARATHI NEWS.

पुणे/संघर्ष गांगुर्डे – सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी वीज उपकेंद्र अतिशय महत्त्वाचे आहेत. या उपकेंद्रांमध्ये सर्व प्रकारची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी ‘आयएसओ ९००१:२०१५’ चे मानांकन घेण्यात येत आहे. त्यासह सर्व उपकेंद्रांनी सुरक्षा मानके पूर्ण करण्यासाठी ‘आयएसओ ४५००१:२०१८’ चे स्वतंत्र मानांकन घेण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिले.

महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून पुणे येथील पद्मावती विभागाच्या साईमिस्टिक २२/२२ केव्ही उपकेंद्राने सुरक्षा वर्गवारीत ‘आयएसओ ४५००१:२०१८’ चे मानांकन मिळवले आहे. धनकवडीमध्ये साईमिस्टिक उपकेंद्रात बुधवारी (दि. ४) आयोजित कार्यक्रमात संचालक पवार यांच्याहस्ते  उपकेंद्राला सुरक्षेचे ‘आयएसओ’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता  सुनील काकडे (पुणे), स्वप्निल काटकर (कोल्हापूर) आणि धर्मराज पेठकर (बारामती) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.  

संचालक पवार म्हणाले की, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी राज्यातील वीज उपकेंद्रांची निगा, गुणवत्ता व सुरक्षा आदींबाबत उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदींबाबत सुधारणा सुरू आहे. गुणवत्तेच्या या मानकांचे पालन करण्यासोबतच उपकेंद्रांनी प्रामुख्याने सुरक्षा मानके पूर्ण करून ‘आयएसओ ४५००१:२०१८’ चे मानांकन घेण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश पवार यांनी दिले.

पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे म्हणाले की, गुणवत्तेएवढीच सुरक्षाही अतिशय महत्त्वाची आहे. सुरक्षेअभावी मालमत्तेचे नुकसान झाले तर ते भरून काढता येईल. मात्र प्राणांतिक अपघातामुळे झालेले नुकसान कोणत्याही प्रकारच्या भरपाईने होऊ शकत नाही. त्यामुळे पुणे प्रादेशिक विभागातील उपकेंद्रांमध्ये गुणवत्तेसोबतच महत्त्वाच्या सुरक्षा मानकांची पूर्तता करून ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळविण्यात येईल.

‘आयएसओ’चे मानांकन मिळविण्यासाठी रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ. संजय घोडके, सहायक अभियंता प्रभाकर पवार तसेच बाबासाहेब शिंदे, पुंडलिक काशिद, सिद्धार्थ एकबोटे, प्रतिक शिंदे, अक्षय वाघमोडे यांनी कामगिरी केली. त्यासाठी ‘आयएसओ’चे परीक्षक नंदकिशोर देशमुख, मोनिका पदकोंडे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते सर्वश्री ज्ञानदेव पडळकर, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अमित कुलकर्णी यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »