नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – सध्या सोशल मिडियचे तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षण झाले आहे. काही जन या सोशल मीडिया व्यासपीठाचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात तर काही जन त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना दिसत आहेत अशीच एक घटना नाशिक शहरात घडली आहे. परिसरात दहशद निर्माण करण्यासाठी एका तरुणाने सोशल मिडियावर धारदार तलवार घेऊन व्हिडिओ प्रसारित केला आहे. पण पोलिसांनी वेळीच काळजी घेत या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने धारदार तलवार सोबत घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इंस्टाग्रामवर दिपक यादव नावाच्या संशयित व्यक्तीने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला. पोलिसांनी या अंकाऊंटवरील माहिती मिळवून अंबड सातपुर लिंकरोड वरील संजीव नगर परिसरातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराईज रोलींग शटर या दुकानात मजुर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. मूळचा उत्तर प्रदेश मधील असलेल्या या युवकाला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार आणि एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आली आहे. या संशयिताविरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



