महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क राजकीय

केडीएमसी निवडणूक आरक्षण सोडतीवर शिवसेनेच्या रवी पाटील यांची हरकत; अन्याय दूर न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर आता तक्रारीचा सूर उमटू लागला आहे. शिवसेना (शिंदे गट) कल्याण पश्चिमचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी या सोडतीतील विसंगतींवर राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक हरकत नोंदवली आहे.

पाटील यांनी आपल्या तक्रारीत प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 15 मधील आरक्षण रचनेवर गंभीर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, या तिन्ही प्रभागांमध्ये आरक्षणाचे वितरण SC, ST, OBC आणि सर्वसाधारण घटकांमध्ये न्याय्य प्रमाणात झालेले नाही, तसेच काही समाजघटकांना अपेक्षित प्रतिनिधित्व नाकारले गेले आहे.

पाटील यांनी म्हटले आहे की, सध्याची आरक्षण रचना समाजातील सर्व घटकांना समान न्याय देणारी नसून, त्यात अनुचित असमानता आहे. प्रभागानुसार आरक्षणाचे संतुलन राखण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.

या संदर्भात त्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना पत्राद्वारे तक्रार सादर केली असून त्रुटी दूर करून आरक्षणाचे पुनर्विलोकन करण्याची मागणी केली आहे.
तसेच, योग्य दुरुस्ती न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

सध्या जाहीर केलेली आरक्षण रचना (प्रभाग 3, 5, 15):

प्रभाग क्रमांक 3

अ – अनुसूचित जाती

ब – अनुसूचित जमाती (महिला)

क – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5

अ – अनुसूचित जाती

ब – अनुसूचित जमाती

क – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ड – सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक 15

अ – अनुसूचित जाती (महिला)

ब – अनुसूचित जमाती (महिला)

क – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ड – सर्वसाधारण

आरक्षण सोडतीवरील या हरकतीनंतर केडीएमसी निवडणुकीचा राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काळात निवडणूक आयोगाकडून या तक्रारीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »