महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

कल्याण परिमंडलात मॅरेथॉनद्वारे सुरक्षा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ

DESK MARATHI NEWS.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे  – महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन १ ते ६ जून दरम्यान राज्यभरात वीज सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कल्याण परिमंडलात रविवारी (०१ जून) सकाळी मॅरेथॉनच्या उत्साही वातावरणात सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. ‘आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार’ हे ब्रिद घेऊन वीज सुरक्षेबाबत जनजागृती करत निघालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्याच्या मॅरेथॉनचे नेतृत्व कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी केले.

महावितरणचा २० वा वर्धापन दिन येत्या ६ जूनला साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित वीज सुरक्षा सप्ताहात वीज सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कल्याण परिमंडल कार्यालयाच्या प्रांगणातून रविवारी सकाळी ८ वाजता कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सहभागातून आयोजित मॅरेथॉनला सुरुवात झाली. वीज सुरक्षेबाबत फलक हाती घेत व घोषणा देत ही मॅरेथॉन प्रेम ऑटो चौकापर्यंत पोहचली. वीज सुरक्षेचा जागर करत ‘रन फॉर सेफ्टी’ हे घोषवाक्य घेऊन निघालेल्या मॅरेथॉनचा समारोप परिमंडल कार्यालयाच्या प्रांगणात झाला.

या मॅरेथॉनमध्ये वाशी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, मुख्यालयातील वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता नितीन काळे, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी अजित ईगतपुरीकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते कौमुदी परदेशी, देबाशिश दत्ता, मिलींद चौधरी, जगदिश बोडखे, मनिष ढाकरे, वरिष्ठ व्यवस्थापक योगेश अमृतकर यांच्यासह उपविभागीय, शाखा अभियंते, कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२ जून रोजी परिमंडलातील सर्वच उपविभागांमध्ये रहिवासी परिसरात वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तर ३ व ४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटूंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षा विषयी निबंध / चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »