महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुंबई

महावितरणच्या संचालक प्रकल्प पदाचा सचिन तालेवार यांनी स्वीकारला कार्यभार

DESK MARATHI NEWS.

मुंबई/संघर्ष गांगुर्डे  -महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून  सचिन तालेवार यांनी बुधवारी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. तालेवार गेल्या २८ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.

नवनियुक्त संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार मूळचे नागपूर जिल्ह्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे झाले आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर श्री. तालेवार १९९७ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूर येथे रूजू झाले. पदोन्नतीने सहायक अभियंता म्हणून कार्यरत असताना सन २००६ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर त्यांनी वर्धा, नागपूर व जालना येथे काम केले आहे. दरम्यान महावितरणकडून त्यांची गूडगाव येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील (एमडीआय) एनर्जी मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंट (पीजीडीएम) अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. सन २००७-०८ मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

 त्यानंतर सन २०१६ मध्ये झालेल्या सरळसेवा भरती मध्ये सचिन तालेवार यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर लातूर येथे काम केले. तर सन २०१८ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे त्यांची मुख्य अभियंता म्हणून निवड झाली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी जून २०१८ ते डिसेंबर २०२२ पर्यंत काम केले. बदलीद्वारे छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना मे २०२३ मध्ये तालेवार यांची इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून निवड झाली. या कंपनीत ते दोन वर्षांपासून कार्यरत होते. त्यानंतर महावितरणचे संचालक (प्रकल्प) म्हणून नुकत्याच झालेल्या थेट भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाली आहे.

‘महावितरणच्या ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेसह (आरडीएसएस) विविध योजनांमधून पायाभूत वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांसोबतच प्रामुख्याने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सर्व योजनांना आणखी गती देत कामे लवकर पूर्ण करण्यात येईल’, असे महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »