DESK MARATHI NEWS.
नवी दिल्ली/प्रतिनिधी -लष्करात भरती होऊन देशाची सेवा करावी हे स्वप्न हे प्रत्येक तरुण तरुणीचे असते. देशाची सेवा करण्याची ही एक मोठी संधी असते. त्याच प्रमाणे लष्करातील नोकरीला जनमानसात खूप मान असतो. पण प्रत्येकाच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासासोबत आपार मेहणतीची जोड लागते. जर तुम्हाला ही लष्करात करियर करण्याचे असेल तर पुढील माहिती तुमच्या साठी.
ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई)/भरती साठी वर्ष 2025-26” साठी पहिली अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती आणि अर्ज करण्याची मुदत 12 मार्च 2025 ते 10 एप्रिल 2025 पर्यंत होती. उमेदवारांच्या आकांक्षा लक्षात घेऊन, अर्ज सादर करण्यासाठी नोंदणीची मुदत 25 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.