महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी बिझनेस

नवी दिल्लीत राष्ट्रपतींनी प्रदान केले स्कोप उत्कृष्टता पुरस्कार

DESK MARATHI NEWS NETWORK.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत 2022-23 वर्षासाठीचे स्कोप उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केले. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, स्कोप उत्कृष्टता पुरस्कार म्हणजे भारताच्या विकासात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उत्सव आहे. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, तांत्रिक आणि नैतिक अशा सर्व निकषांवर चांगली कामगिरी करणे हे एका चांगल्या उद्योगाचे वैशिष्ट्य असते. शाश्वत विकास, कॉर्पोरेट प्रशासन, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि नवोन्मेष अशा अनेक आयामांमधील चांगल्या कामगिरीचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी स्कोपचे कौतुक केले. यातून प्रगती आणि विकासाकडे पाहण्याचा समग्र दृष्टिकोन दिसून येतो, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की स्वातंत्र्यापासून, सार्वजनिक क्षेत्र हे आर्थिक विकास आणि सामाजिक समावेशनासाठीचे एक शक्तिशाली माध्यम राहिले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा विकास, सामाजिक उन्नती आणि संतुलित प्रादेशिक विकासाचा पाया रचला आहे. हे उपक्रम काळानुरूप विकसित आणि परावर्तित झाले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून सरकार आणि समाजाच्या अपेक्षा देखील बदलल्या आहेत. या सर्व बदलांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आपल्या कामगिरीद्वारे आर्थिक आणि राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे लक्षात घेऊन आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, वित्तीय आणि आर्थिक योगदानाव्यतिरिक्त, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी राष्ट्रीय उद्दिष्टांना सर्वोच्च ठेवून संतुलित आणि समावेशक विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांची भूमिका आणि योगदान पाहता, असे म्हणणे योग्य ठरेल की सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हे देश आणि देशातील नागरिकांसाठी विकासाचे उत्प्रेरक आणि समृद्धीचे आधारस्तंभ आहेत. त्या म्हणाल्या की, या उपक्रमांनी प्रशासन आणि पारदर्शकतेची अनेक चांगली प्रारूपे आणि उदाहरणे देखील सादर केली आहेत.

आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या राष्ट्रीय मोहिमांमध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसई) प्रभावी भूमिका बजावत असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान स्वदेशी हवाई संरक्षण नियंत्रण आणि इशारा प्रणाली – आकाशतीरने आपली अतुलनीय क्षमता दाखवली असे त्या म्हणाल्या. या प्रणालीच्या निर्मितीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी भूमिका बजावली आहे असे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक क्षेत्रासाठी ही विशेष अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रपती म्हणाल्या की, राष्ट्रीय सुरक्षेतील स्वयंपूर्ण नवोन्मेष तसेच भारताची वाढती तांत्रिक आत्मनिर्भरता यामध्ये सार्वजनिक उपक्रमांचे योगदान सिद्ध झाले आहे. कृषी, खाणकाम आणि उत्खनन, वस्तुनिर्माण, प्रक्रिया आणि निर्मिती आणि सेवा या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशासमोरील आव्हानांना तोंड देण्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम नेहमीच आघाडीची भूमिका बजावत आले आहेत. 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यात सीपीएसई महत्त्वाची भूमिका बजावतील असे त्यांनी सांगितले. सीपीएसईकडून अशी अपेक्षा आहे की त्यांचे निर्णय राष्ट्र उभारणीसाठी समर्पित असतील, कृती नैतिकतेवर आधारित असतील आणि विचार संवेदनशीलता आणि सामाजिक सेवेने प्रेरित असतील, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्रायझेस (स्कोप) द्वारे प्रदान केले जाणारे स्कोप उत्कृष्टता पुरस्कार हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची उल्लेखनीय कामगिरी आणि योगदानाचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »