DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील ताल बार अँड रेस्टॉरंट विहित वेळे पेक्षा आणि अर्ध नग्न कापडे परिधान केलेल्या महिला आढळल्याने महात्मा फुले चौक पोलिसांनी मालक रोखपाल आणि सहा महिलांवर विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली मध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती वर थेट गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नियम मोडण्याचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे पोलीस परिमंडळ ०३, यांचे आदेशाने महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतील ताल बार अँड रेस्टॉरंट तपासणी करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक गेले असता सदर ठिकाणी ताल बार अँड रेस्टॉरंट हा विहित वेळेपेक्षा जास्त वेळ ०१.४० पर्यंत चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले.तसेच सदर ठिकाणी ०६ महिला सिंगर या तोडक्या कपड्यांमध्ये अश्लील हावभाव करून डान्स करत असताना मिळून आल्याने लागलीच पोलिसांनी ताल बार अँड रेस्टॉरंट वर कारवाई सुरू केली.
पंचां समक्ष ई साक्ष अँप मध्ये पंचनामा करून एकूण १७ पुरुष आरोपी व ०६ महिला सिंगर अशा एकूण २३ असून त्यात मालक अरुण शेट्टी आणि कॅशियर लवकुंश शर्मा समावेश सह आरोपी वर सरकार तर्फे फिर्याद नोंद करून महात्मा फुले पोलीस ठाणे गु. रजि. क्र. ६३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २९६,५४,३(५) अन्वये नोंद करण्यात आला आहे.तसेच एकूण २८९८०/– रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान या कारवाईने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार मालकांचे धाबे दणाणले आहे