कल्याण/रोशन उबाळे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा मॉक ड्रिल कार्यक्रम जाहीर केला असून, या घोषणेला देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करत पूर्ण पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष यांनी कल्याण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधानांनी संपूर्ण देशात मॉक ड्रिल राबविण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम विशेषत: महाराष्ट्रातील १६ प्रमुख शहरांमध्ये होणार असून, यामध्ये आपातकालीन परिस्थिती मध्ये नागरिकांनी कसे वागावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. सध्याच्या बदलत्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत देश सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारचे मॉक ड्रिल अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.”आपण सर्वांनी सजग राहून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे,” असे आव्हानही त्यांनी यावेळी केलेयावेळी रेखा सोनवणे , उदय जाधव , माया कटारिया , प्रवीण खरात, विनोद भोईर, भगवान साठे , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.