महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम पर्यटन

आता एकविरा आईच्या दर्शनासाठी ड्रेस कोड,७ जुलै पासून अंमलबजावणी

DESK MARATHI NEWS.

भिवंडी/ संघर्ष गांगुर्डे – आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे,एकविरा आईचे व मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हि बंदी घालण्यात आली असून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलै पासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.शुक्रवारी कार्ला येथे आई एकविरा देवीच्या मंदिरात विश्वस्थ मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोड संदर्भात हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

कार्ला येथील एकविरा आई हि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून राज्यासह देशातील अनेक ठिकाणाहून भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात.मात्र काही भक्त अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात,त्यामुळे देवीचे व मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी विश्वस्थ मंडळाकडे आल्या असून अनेक भक्तांनी सोशल मिडयाद्वारे ड्रेस कोड संदर्भात मागणी केली केली होती.भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्थ मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घेतांना येथील कर्मचारी भक्तांवर आरडा ओरड करत असून भक्तांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी देखील विश्वस्थ मंडळाकडे आल्या असल्याने मंदिरातील कर्मचाऱ्यांनी देवी भक्तांशी वाद न घालण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली असून एकविरा आईच्या भक्तांनी देखील देवीचे दर्शन घेतांना मंदिरातील सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील ट्रस्टचे प्रमुख विश्वस्थ खासदार बाळ्या मामा यांनी देवी भक्तांना केले आहे.

कोणत्या कपड्यांना बंदी-
शॉर्ट,मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे,मिनीस्कर्ट,फाटक्या जीन्स,हाफ पँट व अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना बंदी घालण्यात आली आहे.

कोणते कपडे घालावेत –

महिला व मुलींनी – साडी, सलवार कुर्ता,किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावेत ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे.

पुरुषांनी व मुलांनी –
धोतर,कुर्ता पायजमा,पँट शर्ट,टी शर्ट व इतर पारंपरिक कपडे ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »