महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी राजकीय

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या संपर्क अभियान पुढील आठवड्यात सुरुवात

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी – पुढील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय शिवसेनेतर्फे आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून कल्याण पश्चिमेतील 38 प्रभागांतही अतिशय परिणामकारकपणे त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसद रत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे संपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर हे संपर्क अभियान म्हणजे एकप्रकारे आगामी महापालिका निवडणुकांची नांदी असल्याची शक्यताही राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

शिवसेनेतर्फे काल मुंबईमध्ये एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिवसेनेचे राज्यातील सर्वच आमदार आणि प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवार – मंगळवारपासून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये या संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेऊन या टिटवाळ्यापासून या संपर्क अभियानाला प्रारंभ होणार आहे. ज्यामध्ये आपल्यासह पक्षाचे सर्वच प्रमूख पदाधिकारी उपस्थित असणार असल्याचेही आमदार भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले.

दर दिवशी एक वॉर्ड अशा पद्धतीने कार्यकर्ते आणि तेथील नागरिक यांना एकत्रपणे भेटण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यांचे मनोगत, अडीअडचणी, पक्षवाढीसाठी संवाद साधला जाईल. त्यासोबतच दुसरीकडे संबंधित प्रभागातील सामान्य नागरिकांनाही या संपर्क अभियानात सहभागी होऊन त्यांच्या नागरी समस्या आणि अडीअडचणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. कल्याण पश्चिमेतील सर्वच्या सर्व म्हणजे 38 प्रभागांमध्ये पुढील आठवड्यापासून हे अभियान राबविण्यात येणार असून ही एकप्रकारे आगामी महापालिका निवडणुकीची नांदी असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »