डोंबिवली/ शंकर जाधव – भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर परब (नंदू परब ) यांची कल्याण डोंबिवली भाजप जिल्हा अध्यक्षपदी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली. या त्यांच्या नियुक्तीमुळे डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपा डोंबिवली ग्रामीण जनसंपर्क कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी केली. भाजपा महिला कार्यकर्त्यांनी नंदू परब यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.जिल्हाध्यक्ष पदावर कोकणची मोहोर लागल्याचे दिसले.
प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून नंद्दू परब यांची ओळख आहे. डोंबिवली तसेच कल्याण मध्ये भाजपाच्या पक्ष वाढीसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस खर्ची केले आहेत. भाजपचा कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची पूर्वीपासून असलेली इमेज भाजपसाठी नेहमीच फायद्याची ठरली आहे.नंदकिशोर परब यांची कल्याण जिल्हाध्यक्ष निवड होतच परब यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल कार्यालयात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. २००७ पासून भाजपचे सक्रिय सदस्य असून त्यांनी अनेक पदांवर कामकाज केले आहे.भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष कर्ण जाधव,नागेश शर्मा, संतोष शुक्ला, महादुसिंग राणा, दत्ता माळेकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परब यांचे अभिनंदन केले.



