महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर चर्चेची बातमी

सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला आमदार विश्वनाथ भोईर यांचा वाढदिवस

DESK MARATHI NEWS ONLINE.

कल्याण/प्रतिनिधी – विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. मात्र त्यातही कल्याणच्या वृद्धाश्रमातील आजी – आजोबांनी दिलेल्या अनोख्या प्रेमळ शुभेच्छांनी आमदार विश्वनाथ भोईर हे चांगलेच भारावून गेल्याचे दिसून आले.

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर, बुद्ध विहारांना आवश्यक वस्तूंची भेट, दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये अन्नदान, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो यासह वृद्धाश्रमातील व्यक्तींना फळ वाटप अशा भरगच्च सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यामध्ये उंबर्डे येथे महाआरोग्य शिबीर, आधारवाडी येथील बुद्धविहारासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा तर बारावे येथील बुद्धविहारासाठी खुर्च्यांची भेट, होलीक्रॉस शाळेजवळील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप, छाया टॉकीज परिसरातील सदिच्छा या दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि केडीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या छावा चित्रपटाचा मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते.

यातील शांतीधाम वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी तर चक्क अतिशय सुरामध्ये “बार बार ये दीन आये, बार बार ये दिल गाये” या सुप्रसिद्ध हिंदी गाण्याच्या माध्यमातून आमदार विश्वनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या प्रेमळ आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या. ते पाहून आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह उपस्थित सर्वच जण अतिशय भारावून गेले होते.

वैयक्तीक कारणास्तव गेली 3 वर्षे आमदार भोईर यांनी आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत दिग्विजयाने कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यांच्या आग्रहास्तव आपण यावर्षी आपला वाढदिवस सामाजिकरीत्या साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले. तर येणारा आपला प्रत्येक वाढदिवस आपण शांती भवन वृद्धाश्रम आणि सदिच्छा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संस्थेसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, गणेश जाधव, माजी नगरसेविका वैशाली भोईर, उपशहरप्रमुख सुनिल खारूक, विभागप्रमुख रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील, चिराग आनंद, युवासेना चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »