DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण /प्रतिनिधी – कल्याण पूर्व येथे रामनवमीनिमित्त ६ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या शुभ यात्रेत नथुराम गोडसेची प्रतिमा झळकवण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करत कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली व समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनद्वारे केली.
या शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप यांच्यासह अनेक महापुरुषांच्या प्रतिमा झळकवण्यात आल्या होत्या. मात्र त्याच सोबत काही समाजकंटकांनी महात्मा गांधींच्या हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची प्रतिमा झळकावून समाजात दंगलमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माहीला कॉँग्रेस कडून करण्यात आला आहे.
त्याच बरोबर या कृत्याचा निषेध व्यक्त करत महिला काँग्रेसच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.निवेदनात अशा प्रकारच्या कृत्याला पाठीशी न घालता त्वरित पुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली.
यावेळी महिला अध्यक्षा कांचन कुलकर्णी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग,प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव,प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी,कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर,महिला सरचिटणीस कोमल भोसले,मोहने टिटवाळा ब्लॉक अध्यक्ष उर्मिला भोईर इ.मान्यवर उपस्थित होते.