महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश न्युजरूम

महाराष्ट्र सदनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा  

DESK MARATHI NEWS NETWORK.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – २७ ऑगस्ट २०२५ : राजधानी दिल्ली आज ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या निनादाने गणरायामय झाली. लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्र सदनासह दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांनी भक्तीपूर्ण उत्साहात साजरे केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र सदनात गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून या उत्सवाला भक्तीमय प्रारंभ केला. यंदा गणेशोत्सवाला महाराष्ट्रात राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने दिल्लीतील मराठी बांधवांमध्ये विशेष उत्साह संचारला आहे. पुढील दहा दिवस दिल्लीत भक्ती, उत्साह आणि मराठमोळ्या सांस्कृतिक जल्लोषाचे वातावरण राहणार आहे.

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा खा. डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली.  यावेळी निवासी आयुक्त आर. विमला, अपर निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक मनिषा पिंगळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकार, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, लेखा अधिकारी निलेश केदारे यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि गणेशभक्त उपस्थित होते. सकाळी कोपर्निकस मार्गावर काढण्यात आलेली  मिरवणूक ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने दुमदुमली. ढोल-ताशांचा गजर आणि मंत्रोच्चारांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा थाटामाटात संपन्न झाली.गणरायाच्या स्वागताने दिल्लीत मराठी संस्कृतीचा ठसा पुन्हा एकदा ठळकपणे उमटला आहे. हा उत्सव भक्ती आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुपम संगम आहे,” असे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.  महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण दिल्लीला सांस्कृतिक रंगात रंगवणार आहे, असे निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी सांगितले. 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आयोजित गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वयं सहायता गटांचे प्रदर्शन  विक्री स्टॉलला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. मराठी संस्कृती, हस्तकला आणि परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या या स्टॉल्समुळे यंदाच्या उत्सवाला विशेष रंगत आली आहे. “हा उत्सव मराठी समाजाला एकत्र आणण्यासोबतच दिल्लीतील इतर समुदायांनाही मराठी संस्कृतीची ओळख करून देतो,” असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले. बचत गटांच्या या प्रदर्शन आणि विक्री स्टॉल्समुळे स्थानिक कारागिरांना आणि छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले असून, मराठी हस्तकलेची ख्याती दिल्लीत पोहोचली आहे.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीपूर्ण जयघोषाने गणरायाचे स्वागत केले. यंदा गणेशोत्सवाला मिळालेल्या राज्य महोत्सवाच्या दर्जाने मराठी समाजाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दिल्लीतील मराठी बांधवांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा एकदा अभिमानाने अधोरेखित केली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. विविध मराठी मंडळांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मराठमोळ्या लावण्या, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आणि मराठी नाट्यप्रयोग यंदाच्या उत्सवात दिसणार आहेत. मराठींसह अमराठी गणेशभक्तांचाही या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, ज्यामुळे दिल्लीत पुढील दहा दिवस भक्ती आणि उत्साहाचे वातावरण कायम राहील.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »