महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

भिवंडीतील नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा; खा. बाळ्या मामांनी मनपा अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

DESK MARATHI NEWS.
भिवंडी/प्रतिनिधी – पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून अवकाळी पावसाने मागील महिन्याभरापासून हजेरी लावली असतानाही मनपा प्रशासनाने नालेसफाईच्या कामात दिरंगाई केली असून ठेकेदारांसह मनपा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचून शहर तुंबण्याची शक्यता निर्माण झाल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.सोमवारी खासदार बाळ्या मामा यांनी तीन बत्ती येथील नालेसफाईच्या कामाचा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला.यावेळी नालेसफाईच्या कामात प्रचंड हलगर्जीपणा झाला असल्याची बाब म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांसमोर दाखवून दिली.या पाहणी दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी खा. बाळ्या मामा यांच्या कडे पावसाळ्यातील नालेसफाईमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचे गाऱ्हाणे मांडले.विशेष म्हणजे म्हात्रे यांनी अचानक केलेल्या नाले सफाईच्या कामाच्या पाहणी दौऱ्यामुळे पालिका प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले.
येणाऱ्या पावसात पाणी साचून नागरिकांचे नुकसान होणार आहे,परंतु याची तमा पालिका प्रशासन अधिकारी कर्मचारी यांना नाही,येथील अधिकारी
व ठेकेदार मस्त असून यांच्या हलगर्जीपणामुळे जनता त्रस्त झाली आहे असा आरोप खासदार बाळ्यामामा यांनी केला असून शहरातील परिस्थिती मागील कित्येक वर्षांपासून अशीच असून नालेसफाई करणारे ठेकेदार ,पालिका कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार होत असून यावेळेस या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित उपायुक्त,आरोग्य विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी मी करणार आहे असा इशारा देखील खासदार खासदार बाळ्या मामा यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला. 
नालेसफाईच्याया कामांचा आढावा घेतल्या नंतर म्हात्रे यांनी बुजूलाच असलेल्या भाजी मार्केट, मच्छी मार्केट मध्ये जाऊन येथील स्वच्छता व सोयी सुविधांची पाहणी केली.येथे प्रचंड अस्वच्छता असल्याने व महिलांसाठी स्वच्छता गृह नसल्याचे पाहून खासदार बाळ्या मामा यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत लवकरात लवकर येथे स्वच्छता करण्याचे व सोयी सुविधा देण्याचे निर्देश दिले.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »