महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

कल्याण तालुका अधिवक्ता परिषदेकडून काश्मिरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध

DESK MARATHI NEWS.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे  – काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर समाजाच्या सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण तालुका अधिवक्ता परिषदेतर्फेही झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून त्याविरोधात निदर्शने करण्यात आली. अधिवक्ता परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत आपला विरोध नोंदवला.

या भ्याड हल्ल्याचा देशातील केंद्र सरकारकडून योग्य तो बदला नक्कीच घेतला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यासह देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची आग्रही मागणीही यावेळी अधिवक्ता परिषदेच्या वतीने करण्यात आली. तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि पीडित कुटुंबीयांना तातडीने मदत आणि न्याय देण्याची मागणीचे निवेदनही कल्याण तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष ॲड. प्रल्हाद भिलारे, तालुका पालक ॲड. सतीश अत्रे, जिल्हा सहसचिव ॲड. अर्चना सबणीस, वरिष्ठ अधिवक्ता के. टी. जैन, कोकण प्रांत सचिव ॲड. रेखा कांबळे, महामंत्री ॲड. पुजा भालेराव, सचिव ॲड. नरेंद्र बोन्द्रे, उपाध्यक्ष ॲड. नागेश कांबळे, व्यवस्थापन प्रमुख ॲड राजु राम, ॲड हेमंत चव्हाण, ॲड. आशीष सोनी, ॲड. तृप्ती बोंद्रे, ॲड शिल्पा राम, ॲड आनंद पवार, ॲड. सुप्रिया नाईक, ॲड. रोनक कारीरा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »